आभाळ
आज नभ जणू धरणीवर,
ओथंबूनी आले..
तुझ्या आठवणीने सखे,
आभाळ व्याकुळ झाले.
वाऱ्याचा गोंगाट न मंजुळ साद,
आसमंत जणू मंत्रमुग्ध झाले.
पिंजलेले रिते ढग जागेवरच,
न हलताच स्तब्ध झाले.
रवीनेही साथ सोडली धनु,
न हि सोनेरी किरण आले.
पाने, फुले, पशु, पक्षी सारे,
किरणांत न्हायचे राहूनी गेले.
निरव शांतता न हि स्वर कोकीळचे,
अजी ऐकायचे स्वप्नच विरले.
प्रभाती या धरणीवर धुके,
शाल कापसाची पांघरून गेले.
आज नभ जणू…..
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६