You are currently viewing शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक*

सिंधुदुर्ग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुकानिहाय कार्यकारिणींच्या बैठका गुरुवार ०२ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात होणार आहे. दुपारी ३ वाजता दोडामार्ग तालुका कार्यकारिणीची बैठक शिवसेना शाखा दोडामार्ग येथे तर सायंकाळी ६ वाजता वेंगुर्ले तालुका कार्यकारिणीची बैठक शिवसेना शाखा वेंगुर्ले येथे होणार आहे.
यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, महिला जिल्हा संघटक श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी महिला विधानसभा संघटक सुकन्या नरसुले, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तरी या बैठकीस सर्व शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी,शिवसेना सेलचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा