*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*॥गोडी गुलाबीना दिन॥*
गोडी गुलाबांना दिन ग्यात कथा उडिसनं
नव साल उनं देखा उनं पंख लाईसनं
दिन सोनाना व्हतात आते लउत परत
नका बसू बरं आते काही हिशोब करत…
जे वाही गये भलबुरं नको याद त्यांनी
पाय ठेवा भुईवर आनि डोकं ठेवा ध्यानी
करा इचार चांगला भलं करा कोनं तरी
कष्टाले हटू नका मनी राही तरतरी…
कष्टाले येस फय नही मरत हो कोनी
लाथ मारानी हिंमत आनि काढा तठे पानी
जसा इचार करो ना तसं तसं व्हसं बरं
करा चांगला इचार बठ्ठ हुईजाई खरं…
चला वावरे पिकाडा खतपानी घाला त्याले
हाई कॅांक्रिटनं जंगल नही देवाव खावाले
भुईमाय ले पुजा हो करा तिनी निगरानी
हिरवाईना व्हा धनी तिले करी टाका धानी…
लागे खावाले भाकर गंज महामूर देस
देखा बांधबांधवर टंच दानानं कनिस
मायमाटीले इचारा मनोभावे करा सेवा
खेतवावरम्हा देखा कशी निर्मय ती हवा…
नववरीस आपलं आपनंच त्याले घडू
प्रेम बंधुभाव दया यासले खेतम्हा पिकाडू…
करा ठराव मनम्हा काय काय करनं से
देव सदा सोबतीले काम आपुनले करनं से…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)