You are currently viewing खासदार नारायण राणे यांच्या दातृत्वामुळे अपघातात एक पाय गमावलेल्या रुद्र घाडीला मिळाला कृत्रिम पायाचा आधार…

खासदार नारायण राणे यांच्या दातृत्वामुळे अपघातात एक पाय गमावलेल्या रुद्र घाडीला मिळाला कृत्रिम पायाचा आधार…

खासदार नारायण राणे यांच्या दातृत्वामुळे अपघातात एक पाय गमावलेल्या रुद्र घाडीला मिळाला कृत्रिम पायाचा आधार…

कुटुंबीयांनी मानले राणेंचे आभार

देवगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दहीबाव आचरा मार्गावर ऑटो रिक्षाला समोरून येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार धडक दिलेल्या दुर्घटनेत आपला उजवा पाय गमवावा लागलेल्या कुमार रुद्र धोंडू घाडी, वय वर्ष १० या मुलाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या आरोग्यसेवेचे काम पाहणारे कार्यकर्ते झाहिद भाई खान व फॅमिदा पनवाला मॅडम यांच्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुद्र याला नवीन कृत्रिम पाय बसवण्यात आला असून आज रूद्र घाडी व त्यांच्या आई-वडिलांनी मुंबई येथे नारायण राणे व सौ. नीलम राणे यांची भेट घेतली, यावेळी घाडी कुटुंबाची विचारपूस करत त्यांना राणेसाहेबांनी नेहमीप्रमाणे स्व:खर्चातून त्यांना मदत केली आहे..! यावेळी घाडी यांच्या कुटुंबीयांनी राणी यांचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा