You are currently viewing भेट

भेट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भेट*

 

दौडतात इलेक्ट्रॉन वीज भारित झाले अंग

भेटणार कधी कुठे सखे एकदा तरी सांग।

 

पाहताच बालीके तुजला डीपी लागला जळू

भेटताच सप्लाय हा चालू होईल हळू हळू।

 

नको कुंपण जरी सबस्टेशन हे आऊटडोअर

खुल्लमखुल्ला भेट बदली झालेय कॅलेंडर।

 

जुळता उभयता तारा जॉईंट होईल पक्का

सोडशील सजने जेंव्हा न बोलण्याचा हेका।

 

नको बदलू जरी जुना झालाय ट्रान्सफॉर्मर

झालाय आधीच हैराण लोड शेडिंगने पामर।

 

बांधील तुजस्तव उच्च दाब वाहीनीचा मनोरा

झालाय खूप हळवा भेटीलागे हृदय कोपरा।

 

होताच स्पर्श तुझा पेटावे तनामनातील दिवे

वाटे अणूरेणू होऊन तुझ्यात मिसळून जावे।

 

झालीय डाऊन बॅटरी करंटही झालाय कमी

होईल रिचार्ज जीवन द्यावी गुप्त भेटीची हमी।

 

बिजलीहून चपल तू मज नको करू निराश

दे धक्का ४४० होल्टचा करून टाक बेहोश।

 

सिटी पिटी सारखी घिसीपिटी झाली स्वारी

भेटशील तेंव्हा सांगेल तूच खरीखुरी माधुरी।

 

संपले जुने वर्ष नवीन वर्षाचा संकल्प करतो

आपल्या भेटीसाठी भव्य पॉवर स्टेशन बांधतो।

 

विलास कुलकर्णी

मीरा रोड

 

सर्व विद्युत अभियंत्यांकडून नवीन वर्ष २०२५ साठी हार्दिक शुभेच्छा

प्रतिक्रिया व्यक्त करा