*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जुन्या वर्षाला निरोप*
जुन्या वर्षाला
आता निरोप देताना
वळून बघतांना
मागे….
निरिक्षण करते
आणखी काय कमावले
काय गमावले
आयुष्यात….
घडेल तसे
मदतीचा दिला हात
निरनिराळ्या प्रसंगात
गरजूंना….
भेटीगाठी आप्तांच्या
जेष्ठ मंडळींना भेटले
आशीर्वाद मिळाले
भरभरून….
कुठे चुकलो
नकळत कधी आपण
चुकांचं परिमार्जन
संभाषणाने…
आजार ताणतणाव
घ्यायची काळजी स्वतः ची
काही नियमांची
उजळणी….
कटु अनुभव
तिथेच द्यायचे सोडून
नवे स्विकारून
वाटचाल…..
नवीन वर्षाला
निरोप देत असता
आनंदी मानसिकता
स्वागतास….!!
~~~~°°°°°°~~~~°°°°°°~~~
अरुणा दुद्दलवार ✍️