*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फटका*
आनंदाने निरोप देउ पण दारूचे नाव नको
वर्ष अखेरी करु साजरी त्या व्यसनांना ठाव नको
मौज मजेच्या खुळ्या कल्पना टाकून देउ यंदाला
कुटुंबासह करु साजरी सोमरसाला वाव नको
या व्यसनाने किती खांगले किती भंगले पहा जरा
आयुष्याची करण्या होळी गुत्यावरती धाव नको
मुले कोवळी पिढी समोरी पहात आहे तुजला रे
ठेव समोरी आदर्श नवा घोटा साठी धाव नको
नव्या वर्ष्याचे संकल्प नवे चला करु या जोमाने
त्या व्यसनाचे घराघराला आता कोणते घाव नको
मनुष्यजन्म तुला मिळाला आहे खूपच भाग्याने
त्या जन्माचे सार्थक कर रे वाहवणारा डाव नको
श्रीनिवास गडकरी
@सर्व हक्क सुरक्षित
रोहा पेण पुणे
नावासहितच पुढे पाठवावे.