You are currently viewing आदर्श साहित्य संमेलन

आदर्श साहित्य संमेलन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा.सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आदर्श साहित्य संमेलन* 

( प्रेरणा साहित्य संमेलन-शिरोडा )

 

अविचल मन ज्याचे

सुविचारी स्थिर होते |

सकारात्मक होऊनि

सामर्थ्य नित्य ते देते ||१||

कार्य निवडूनि ऐसे

अखिल झोकून देती |

त्यांच्या मनी कार्य काली

ती निःस्वार्थ शर्थ होती ||२||

ऐका साहित्य प्रेरणा

प्रेरकांची ही कहाणी |

त्यांच्या मनात जे आले,

ते सत्य करवियले ||३||

हृदयी निकोप तत्व

त्यांनी घट्ट धरियले |

विवेकधारा अमृत

प्रबंधे धरवियले ||४||

केले संघटित मित्र

आणिक आप्तेष्ट पात्र |

याल तर तुम्हांसह

तडीस निश्चित मात्र ||५||

आले सारे एक झाले

दिनविशेष आखले |

असे नियोजन झाले

जे सुसंगत जाहले ||६||

सर्व पूर्व तयारीत

परिपूर्णताही आली |

पंचवीस डिसेंबर

मंगल पहाट झाली ||७||

नऊ वाजता मंडळी

उगवली कार्यस्थळी |

नोंदणी ते चहापान

सुरु नियोजित वेळी ||८||

ठीक दहा वाजताच

सोहळा सुरु वेळीच |

सारे सूत्र बद्ध होते

सूत्रसंचालीत होते ||९||

हृदयी मंगल सुर

गातात स्वागत गीत |

हिच अमुची प्रार्थना

स्वरबाला गाते गीत ||१०||

दीप तेज उजळीत

जाहले हे उद्घाटन |

उचित विषय घेत

श्रोत्यास मार्गदर्शन ||११||

मराठी वाचन हित

वदती मनोगतात |

हेरुन लोकरुची ती

कथती संमेलनात ||१२||

परिसंवाद सुंदर

बालवाचन सुलभ |

प्रयोगशील मंथन

विवेका येई सुलभ ||१३||

पुस्तक प्रकाशनाचा

सोहळा हा मुबाईचा |

रंगवाचा विशेषांक

शुद्ध मराठी माईचा ||१४||

पूर्वार्ध आनंदे पार

श्रोते हर्षीत अपार |

हवे हवेसे असता

झाली मध्यान्ह सुपार ||१५||

भुकेला भोजन वेळी

जठराग्नीचा सोहळा |

पक्वान्ना जिव्हा चंचल

अधीर मुख कवळा ||१६||

मधुर गीत पुराणे

सुर निराळे तराणे |

भावभक्तीने भाऊक

मराठी गीत भाराने ||१७||

आता उत्तरार्ध सुरु

काव्य मधुर मराठी |

कवी संमेलन सुरु

अक्षर गीत मराठी ||१८||

मधुर चहापान हे

काव्य रसही मधुर |

स्मरण दळवीचें हे

शिरोडा विभूतीपुर ||१९||

असे ज्ञानी जयाकाका

लेखी कथानुभव ते |

कथे ‘’ वाट ही सरेना ”

आनंद ये बहराते ||२०||

स्पर्धा पारितोषिकांचे

स्पर्धका हर्षोत्सव दे |

स्वागत नवोदितांचे

भाषा कला बहर दे ||२१||

मंत्रमुग्ध आसमंत

घटी पुढे समारोप |

आनंद निधान थाट

ठराव संकल्प छाप ||२२||

मराठी उत्कर्षा वाट

सदा सुखदायी होत |

आम्ही वचनी निबद्ध

वाचनी लेखनी होत ||२३||

समस्तांचे आभारीत

कोटी स्मरण करीत |

विलक्षण स्वानंदात

एकरुप संघटित ||२४||

अलौकिक कार्य होई

उदयास येत सिद्ध |

निर्विघ्न दे वरदान

अंतर्मन करि सिद्ध ||२५||

 

कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

फणसखोल, आसोली, ता.:-वेंगुर्ला,

जि.:-सिंधुदुर्ग, राज्य :-महाराष्ट्र.

प्रतिक्रिया व्यक्त करा