‘एक जिल्हा एक उत्पादन’ पुरस्कारासाठी सिंधुदुर्गचा समावेश
सिंधुदुर्गनगरी
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India तर्फ केंद्र शासनाच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ पुरस्कारासाठी देशातील 60 जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे.
केंद्रीय वाणिज्य अणि उद्योग मंत्रालयाच्या Invest India चे सहाय्यक व्यवस्थापक ताशी दोरजी शेर्पा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पडताळणी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संगणकीय साद्रीकरण केले. त्यावेळी काजू आणि काजू उत्पादनाबाबत व काजू प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली. “वेंगुर्ला काजू” यांस सन 2018 मध्ये जीआय (GI) मानांकन मिळाले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72000 हेक्टर क्षेत्रामध्ये काजू लागवड झालेली आहे. देशामध्ये काजूप्रक्रियामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, असेही श्री.पाटील म्हणाले.
याबाबत में रुक्मीणी फूडस, हुमरस या उद्योग घटकास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी काजू उत्पादन प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी जिल्हा काजू उत्पादन व प्रक्रिया उद्योगात अग्रेसर झाला असून ‘वेंगुर्ला कॅश्यु हा एक ब्रँड झाला आहे, असे श्री. शेर्पा म्हणाले.
यावेळी कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली 7- Point Agenda for ODOP Promotion ही संकल्पना चे संगणकीय सादरीकरणव्दारे दाखविण्यात आले. या मध्ये, जिल्हा उद्योग केंद्र येथे ODOP Facilitation Centre उभारण्यात आले आहे. Sister District Concept जिल्ह्यामध्ये राबविला जात असून शेजारील जिल्हे तसेच केरळ, तामीळनाडू राज्यातीलल उद्योजक, शासकीय संस्था यांची मदत घेतली जात आहे. उद्योजकांना याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये तंत्रज्ञान, अॅडींग, पेंकिंग दर्जा याबाबत प्रशिक्षण दिले जाते. MSIDP अंतर्गत दोन क्लस्टर कार्यान्वित असून उद्योग घटकांना तथे सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण प्रश्नावली व उत्तरांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी वेंगुर्ला तालुका क्लस्टर तसेच मालवण तालुका क्लस्टर यांनी त्यांचे क्लस्टरबाबत माहिती दिली.