You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी…

जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेनंतर वादळ शमले…

ओरोस / प्रतिनिधी :-

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बैठक आज काँग्रेसच्या ओरोस येथील जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ज्येष्ठ नेते दादा परब, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, प्रकाश जैतापकर उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला प्रचंड गदारोळ, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, जिल्हाध्यक्षांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत वादळ शमवीले. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची ही जम्बो बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष बाळा गावडेयांच्या सूचनेनुसार जिल्हा कार्यकारणी व्यतिरिक्त बैठकीस कोणी उपस्थित असतील तर त्यांनी बाहेर थांबा असे आवाहन चंद्रशेखर जोशी यांनी केल्यावर प्रचंड गदारोळ झाला. सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, संदीप सुखी यांनी धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. माजी महिला जिल्हाध्यक्षा नीता राणे यांनी आपण मर्जीतील कार्यकर्त्यांची नियुक्ती करता असा आरोप केला. या सर्व गदारोळानंतर जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षवाढीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रत्येक तालुकाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना पक्षवाढीसाठी वेळ देणार असा विश्वास व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा