You are currently viewing मळगाव येथे १८ जानेवारी रोजी स्व.डॉ.सौ. मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा

मळगाव येथे १८ जानेवारी रोजी स्व.डॉ.सौ. मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा

मळगाव येथे १८ जानेवारी रोजी स्व.डॉ.सौ. मालती खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा

कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरतर्फे आयोजन

सावंतवाडी

मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुलांसाठी १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ला तालुक्यातील शाळांमधील मुलांसाठी आहे. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८वी ते १० वी अशा दोन गटात वाचन मंदिरात होणार आहे. ५bवी ते ७ वी गटासाठी मातृदेवोभव, शिवराय आज असते तर व पुस्तकांच्या सहवासात मी, असे विषय असून यासाठी ४ ते ५ मिनिटे वेळ आहे. ८वी ते १०वी

गटासाठी रतन टाटा – यशाचे दुसरे नाव, सेंद्रिय शेती गरज व महत्त्व, वाचन संस्कृतीचे बदलते रूप आणि आजचा वाचक हे विषय असून यासाठी ५ ते ६ मिनिटे वेळ आहे. वरील तालुक्यातील शाळांनी आपल्या प्रशालेतील मुलांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा