You are currently viewing भाजपाच्या माध्यमातून दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम – प्रसंन्ना देसाई

भाजपाच्या माध्यमातून दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम – प्रसंन्ना देसाई

भाजपाच्या माध्यमातून दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम – प्रसंन्ना देसाई

दिव्यांगांना ट्रायपॉड आधारकाठीचे वाटप…

वेंगुर्ले

शारीरिक किंवा मानसिक त्रुटीमुळे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेऊन , दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून भाजपाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध उपक्रम आयोजित करुन अनेक दिव्यांगांना अडचणीतून सावरण्याचे काम आतापर्यंत भाजपाने केले आहे, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले. भाजपा तालुका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वेंगुर्ले शहरातील अनिल शिवलाल राणे यांना ट्रायपॉडचे वाटप करण्यात आले.

यावेळी ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर व पपु परब , उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , सोमनाथ सावंत, दशरथ गडेकर, सोशल मिडीयाचे अमेय धुरी इत्यादी उपस्थित होते. तसेच उभादांडा – कुर्लेवाडीतील मनिषा नारायण रेवंणकर हीला घरी जाऊन ट्रायपॉड देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , मच्छिमार नेते दादा केळुसकर , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , शक्तिकेंद्र प्रमुख देवेंद्र डिचोलकर , बुथ प्रमुख आनंद मेस्त्री व किशोर रेवंणकर , दिवाकर कुर्ले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा