You are currently viewing अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा…

अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा…

अंगणवाडी सेविकांचा मानधनाचा मार्ग मोकळा…

भत्त्यापोटी १६३ कोटींचा निधी उपलब्ध

मुंबई

नवी मुंबई येथील एकात्मिक बालविकास सेवा यांच्या अखत्यारीत एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. पण केंद्र शासनाकडून वेळेत निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वेळेत देता यावे, यासाठी अपर मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखाली दोन जून २०१७ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय साहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण १६३.४३ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे.

रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम केंद्रीय साहाय्य यांच्याकडून प्राप्त होत असली तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे डिसेंबर २०२४ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकूण १६३.४३ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लवकरच अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन मिळणे शक्य होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा