You are currently viewing देवगड-निपाणी राज्य मार्गावर फोंडा घाटपर्यंत खड्डेच खड्डे

देवगड-निपाणी राज्य मार्गावर फोंडा घाटपर्यंत खड्डेच खड्डे

देवगड-निपाणी राज्य मार्गावर फोंडा घाटपर्यंत खड्डेच खड्डे ;

तातडीने दुरुस्ती न केल्यास करणार रास्ता रोको आंदोलन – संदेश पारकर

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

कणकवली

देवगड-निपाणी या राज्यमार्गावरील नांदगाव ते फोंडाघाटपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतूकीस धोकादायक झाला आहे. एकीकडे गगनबावडा, भुईबावडा आणि आंबोली हे घाट अवजड वाहतुकीसाठी बंद असताना फोंडाघाटातून अवजड आणि इतर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास फोंडाघाट रस्त्यावर स्थानिक नागरिकांसह कोणतीही पूर्व सूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा