You are currently viewing पंक्तीत गातात तुझेच श्लोक

पंक्तीत गातात तुझेच श्लोक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पंक्तीत गातात तुझेच श्लोक*

 

भारावून गेलो कार्य पाहून

चारोळ्यांचा पडतोय खच

कविता का मागे रहातील

हिशोब मांडती त्याही चोख…

अलक विलक्षण लावून चटका

रसिकांसाठी असतो झटका

अभंग वाणी मधाळ होवुनी

मृदुंग साथीला धरतो ठेका….

लावणी गाते *भक्ती* गीते

चमत्कार त्याचा सांगू कसा

नाडी ओळखून रसिकांची

रीता केलास त्यांचा खिसा….

काढून चीजा *पोतडीतुनी*

जिंकलीस तू *रसिक मने*

हट्ट पुरवीत लेखणी राहीली

डोलवत नभी शुभ्र चांदणे….

कथा कहाण्या जरी *पुराण्या*

काढून आठवण वाचतात लोक

अभिजात दर्जा भावतो सर्वांना

पंक्तीत गातात तुझेच *श्लोक*….

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

9 3 2 4 3 2 4 1 5 7

प्रतिक्रिया व्यक्त करा