*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निरोप तुजला देऊ कसा – २०२४*
निरोप तुजला देऊ कसा
जाता जाता आता
संकटांची मालिका साहून
थकलो आम्ही आता
आले वर्ष गेले वर्ष कुठे सरले
दिवस न दिवस कळत नव्हता
वर्षभराचा आलेख होता
जगण्याचा हुरूप होता
नाविण्याचा आशावाद होता
प्रत्येकाच्या आयुष्यात
उजेड दिसणार होता
विसरून चालणार नाही
काळाचा क्रूर खेळ
निरोप तुला देतांना
बसू दे आयुष्याचा मेळ
जाता जाता एकच मागणे आता
येणाऱ्या नववर्षात
महामारीचे, महागाईचे
संकट टळू दे पळू दे जळू दे
सर्व मानव प्रजातीच्या आयुष्यात
नवचैतन्य येऊ दे
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.