*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घरटे सोडून जाताना*
मनाला वेदना
घरटे सोडून जाताना
उरलेल्या खाणाखुणा
मिटतात….
आजवर जोडले
घरटे काडी काडीने
सांधले कसोशीने
कित्येकदा….
आजवर आपण
पिल्लांना नीट सांभाळलं
भविष्य घडवलं
यशस्वी…..
नवी घरटी
बांधली आता पिल्लांनी
अत्याधुनिक सोयींनी
परिपूर्ण…
जुने घरटे
आले मोडकळीस आता
पाऊल निघेना
इथून…..
कधीतरी लागेल
पिल्लांच्या घरट्याचा निवारा
काड्यांचा पसारा
इथेच…..
घरटंच नव्हे
जीव इथे टांगला
आठवणींचा बांधला
झोका….!!
~~~~~~~~~~~~~~
*अरुणा दुद्दलवार@✍️*