ओटवणे गाव चव्हाटा महोत्सव आजपासुन गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे आयोजन
सावंतवाडी
ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळ आयोजित गाव चव्हाटा महोत्सव शनिवारी २८ व २९ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गाव चव्हाटा महोत्सवाचे यावर्षीचे ११ वर्ष आहे.
यानिमित्त शनिवारी गाव चव्हाटा येथे २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता, त्यानंतर गाव चव्हाटा महोत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन, रात्रौ ९ वाजता स्थानिक मुलांचे विविध गुणदर्शन मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. रविवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता शतदीप सोहळा, रात्रौ ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत दत्त माऊली दशावतारी नाट्य मंडळ (सिंधुदुर्ग) यांचा ट्रिकसिनयुक्त ‘ अन्नपूर्णा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर सचिव महेश चव्हाण मंडळाचे सर्व पदाधिकारी व गावठणवाडी ग्रामस्थांनी केले आहे.