आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ३० डिसेंबर रोजी..!
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळ, आरोस संचलित, विद्याविकास हायस्कूल आरोस या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २०२४-२५ सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून नॅशनल युनियन ऑफ सी फुड माजी अध्यक्ष, मराठा समाज सहकारी बँक अध्यक्ष अॅड. प्रेमानंद साळगावकर हे असणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील व जिल्हा तांत्रिक तज्ञ नगर विकास सिंधुदुर्गचे निखिल आनंद नाईक उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष रोहिदास सावंत, उपाध्यक्ष निलेश परब, सचिव राजन नाईक, मुख्याध्यापक शिरीष नाईक, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष प्रसाद मसूरकर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ. श्रद्धा मुळीक, सांस्कृतिक कार्य मंत्री कु. देवराव मुळीक, मुख्यमंत्री कु. साईश जाधव तथा सर्व संस्था सदस्य, पालक – शिक्षक संघ सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी केले आहे.