*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*थंडी कडाक्याची*
आली थंडी कडाक्याची
लागे बोचरी अंगाला
मऊ पांघरून घेवु
धुके पडती पानाला
भल्या पहाटे उठुन
चला *शेकोटी* पेटवु
काड्या सरपण टाका
थंडी दमात चेटवु
पशु पक्षी शहारले
झाडं वेली गारठल्या
जाई जुई कमानीत
उब घेण्याबावरल्या
येता उन्हाची तिरीप
अंगी रोमांच लचके
गार झुळुकेने दव
मोती उन्हात चमके
पानगळ झाली झाडांची
फुटली कोवळी पालवी
खुलला छान निसर्ग
भुरळ मनाला भुलवी
*शीला पाटील. चांदवड.*