*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*? ❤️ ❤️ प्रेम आणि लग्न*
सिंह सिंहिणीला घाबरत नाही
कारण तो फक्त प्रेम करतो
पुरुष स्त्रीला घाबरत असतो
कारण तो फक्त लग्न करतो ।।
प्रेम म्हणजे निव्वळ मज्जा
सिंह किती रुबाबदार फिरतो
लग्न म्हणजे केवळ सजा
पति कसा जबाबदार दिसतो ।।
प्रेमात केवढी मिठास असते
त्या सिंहालाच विचारुन घ्या ना !
लग्नात केवढी खटास असते
लग्नवाल्यांकडून जाणून घ्या ना !!
लवकर लवकर ठरवा सारे
उशीर उगाच काही करु नका
प्रेमाने होतो बाष्कळ बडबड्या
लग्नाने होतो लडिवाळ मुका ।।
विचार करा मित्रांनो माझ्या
प्रेम करायचं का बंदिशाळा लग्न !
प्रेम करत उत्साही रहा
लग्न करुन नका होवू भग्न !! ।।
भग्न झालात तर माझ्याजवळ
उपाय सत्य आहे सावरण्याचा
लग्न जिच्याशी झालेच आहे
तिच्यावर खरंखुरं प्रेम करण्याचा ।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख
नाशिक ९८२३२१९५५०