रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून दुर्मिळ रक्ताच दान करत महिलेला जीवदान
सावंतवाडी
येथील डॉ.नवांगूळ यांच्या यशराज रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या महिला रुग्णाला अवघड शस्त्रक्रियेवेळी A- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची तातडीने आवश्यकता असता युवा रक्तदाता संघटना मदतीसाठी पुढे सरसावली. दुर्मिळ रक्ताच दान करत महिलेला जीवदान दिले.
महिला रुग्णाला अवघड शस्त्रक्रियेवेळी A- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असल्याचे समजताच युवा रक्तदाता संघटनेचे पंकज बिद्रे, गौरेश कामत यांनी रक्तदान केले. दरम्यान, याच रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या महिला रूग्णाला A पॉझिटिव्ह पीसीवही या रक्तगटाची आवश्यकता होती तेव्हा पवन बिद्रे यांनी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी ओरोस येथे धाव घेत रक्तदान करुन दोन महिलांचे प्राण वाचवले. तसेच ओरोस जिल्हा रुग्णालय येथील रूग्णाला O- निगेटिव्ह या रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती. याबद्दल सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे यांनी देव्या सुर्याजी यांना संपर्क साधताच तात्काळ बिबवणे येथील प्रसाद निर्गुण यांनी जिल्हा रक्तपेढी ओरोस येथे रक्तदान केले. युवा रक्तदाता संघटनेकडून धाव घेत तीन महिला रूग्णांना जिवदान दिले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल सर्व रक्तदाते व युवा रक्तदाता संघटनेचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानलेत.