चांदा ते बांदा योजनांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या चांदा ते बांदा योजनांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. या अनुषंगाने दि. 28 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद सभागृह सावंतवाडी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये मोठ्या संख्यने शेतऱ्यांनी उपस्थित रहावे.
चांदा ते बांदा अंतर्गत राबविण्यात येत असणाऱ्या योजना पुढीलप्रमाणे, आंबा जुन्या फळबागांचे पुनरुजिवन, आंतरपिक पध्दतीने मसाला पिकांचा क्षेत्र विस्तार करणे, कोकम, करवंद, जांभूळ व फणस क्षेत्रातवाढ करणे.
अटी, शर्ती पुढीलप्रमाणे :- कषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून लाभार्थ्यांची निवड व अनुदान देण्यात येईल. शेतकऱ्यांनी आपले अर्ज दि. 28 डिसेंबर 2024 रोजी नगरपरिषद सभागृह सावंतवाडी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्यामध्ये किंवा 31 डिसेंबर 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत. अनुदानाची रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल.
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.