सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात एकमुखी मागणी
अमरावती दि. 26-
शिक्षण कृषी व शैक्षणिक या क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देऊन शासनाने गौरव करावां असा ठराव अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अहिल्यानगर येथे करण्यात आला आहे. सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते व सहकार खात्यात खात्यातील विभागीय सहनिबंधक श्री के ई हरिदास यांनी हा ठराव मांडला असून अनुमोदक म्हणून अमरावतीचे डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आहे. अहिल्यानगर येथे नुकतेच अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन संपन्न झाले. त्यात हा ठराव बहुमताने मंजूर झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील श्री के के चौधरी हे कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी गृहमंत्री श्री अमित शहा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेले आहे. तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ व्ही टी इंगोले व प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सह्याची मोहीम राबवली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची 125 वी जयंती संपूर्ण भारतात संपन्न होत असताना त्यांना हा बहुमान देऊन शासनाने त्यांच्या कार्याचा योग्य तो गौरव करावा अशी विनंती महाराष्ट्र शासनाला व केंद्र शासनाला संयोजन समितीने केली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी माजी कृषी मंत्री व राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी राज्यसभेत हा विषय मांडला असून लोकसभा सदस्य श्री अमर काळे यांनी देखील या कामी पुढाकार घेतलेला आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी तुम्ही मला प्रस्ताव करून द्या मी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन संयोजन समितीला दिले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीच्या वर्षानिमित्त केंद्र शासनाने हा निर्णय घेऊन पंजाबरांना न्याय द्यावा अशी मागणी जनमानसातून होत आहे.
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस
अमरावती
9890967003