*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुमडी*
जगी माजला अनितीचा पसारा
त्यात अडकला गुणी बिचारा
सुविचारांचे धडे त्यांना द्या ना
घ्या तुमडी झोळी माझी भरा ना
कुणी न उरला सखा सोबती
सारेच फिरती रुपया भोवती
पैसा असे नश्वर सांगा त्यांना
घ्या तुमडी झोळी माझी भरा ना
मनात कोंडली घुसमट सारी
बेडीत परंपरेच्या बांधली नारी
गर्भात तिचे चिरडणे थांबवा ना
घ्या तुमडी झोळी माझी भरा ना
गढूळ झाली इंद्रायणी देवा
कुठे शोधू मी भक्तीचा ठेवा
झोपी गेले त्यांना जागवा ना
घ्या तुमडी झोळी माझी भरा ना
*राधिका भांडारकर*