You are currently viewing डॉ सुशिल सातपुते यांच्या ‘ध्यास’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा व कविसंमेलनाचे आयोजन

डॉ सुशिल सातपुते यांच्या ‘ध्यास’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा व कविसंमेलनाचे आयोजन

छ. संभाजीनगर –

कवी प्रा.डॉ. सुशिल सातपुते लिखित ध्यास कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा व कवीसंमेलन शनिवार दि.२८ डिसेंबर रोजी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर येथे रेल्वे स्टेशन रोडवरील इंजीनियरिंग कॉलेजच्या बाजूला भानुदास चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. चंद्रकांतदादा वानखेडे राहतील. तसेच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मा. श्री. भारत सातपुते यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात भाष्यकार म्हणून येथील सुप्रसिध्द लेखिका माधुरी चौधरी असतील. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार श्री. हबीब भंडारे तसेच सुप्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेता, संपादक श्री.गुलाबराजा फुलमाळी लाभलेले आहेत.

ध्यास या काव्यसंग्रहाची निर्मिती लातूरच्या मांजरा प्रकाशनची आहे. कवी डॉ.सुशिल सातपुते यांना साहित्य क्षेत्रातील बंधुता काव्यप्रतिभा, बंधुता प्रकशयात्री साहित्य पुरस्कार प्राप्त आहेत. प्रा. डॉ. सुशिल सातपुते हे सध्या छ्त्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था, कृषि महाविद्यालय कांचनवाडी, छ्त्रपती संभाजीनगर येथे कृषिविद्या विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

या प्रकाशन समारंभानंतर लागलीच कवीसंमेलन होणार असून या कवीसंमेलनात शहरातील व परिसरातील नामवंत कवींची हजेरी लागणार आहे. तरी आपण या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन काव्यस्पंदन समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा