योग्य हमीभाव भात खरेदीतून शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचा शासनाचा प्रयत्न ! सौ.संजना आग्रे
फोंडाघाट विकास सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ !
फोंडाघाट
शासनाच्या योग्य हमी भावांतर्गत भात खरेदीचा शुभारंभ कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या फोंडाघाट विकास सेवा सोसायटी केंद्रावर,नुकताच संघाचे संचालक बबनमामा हळदीवे आणि फोंडा सरपंच सौ. संजना आग्रे यांचे हस्ते, श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी वजन काट्याला पुष्पहार घालून भात गोणीचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .
शासनाच्या योग्य हमीभावामुळे भात पिकाला व शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळून स शेतकरी सक्षम होतील. असा विश्वास फोंडा सरपंच सौ. संजना आग्रे यांनी व्यक्त केला. तर परिसरातील शेतकऱ्यांनी आपले भात विक्री रजिस्ट्रेशन द्वारे, भात योग्य हमीभावात केंद्रावर आणून शासनाच्या सुत्य उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सोसायटी चेअरमन राजन नांचे यांनी केले.
यावेळी संघाचे संचालक मिथिल तथा पिंटू पटेल, सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रद्धा सावंत, उपसरपंच सौ.तन्वी मोदी, संदेश पटेल, हेमंत रावराणे, ध्रुवबाळ गोसावी, प्रसाद देसाई, मिलिंद तावडे, दामोदर परब आणि शेतकरी उपस्थित होते…..