*”श्रोत्यांशी सहजसंवाद साधणे हाच यशस्वी निवेदनाचा मूलमंत्र!” – सुधीर गाडगीळ*
पिंपरी
“अनौपचारिकपणे साध्या अन् सोप्या शब्दांतून श्रोत्यांशी सहजसंवाद साधणे हाच यशस्वी निवेदनाचा मूलमंत्र होय!” असे मत ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शाहीर योगेश रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २५ डिसेंबर रोजी व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त तसेच त्यांच्या निवेदन क्षेत्रातील सुवर्णमहोत्सवानिमित्त कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्काराला उत्तर देताना गाडगीळ बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच सुप्रसिद्ध नर्तक आणि संस्कारभारती, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष पंडित डॉ. नंदकिशोर कपोते, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्याध्यक्ष शिरीष पडवळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर पिंपरी – चिंचवड परिसरातील विविध साहित्य आणि सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.
याप्रसंगी बुद्धिमत्तेचे प्रतीक असलेली पुणेरी पगडी, मोरया गोसावी यांच्या आध्यात्मिक वारशाचे प्रतीकात्मक उपरणे, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रदान करून सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. नंदकिशोर कपोते यांनी आपल्या मनोगतातून आपल्या अनेक सांस्कृतिक मैफिलींना गाडगीळ यांच्या खुमासदार निवेदनाची साथ लाभली, असे सांगून त्या आठवणींना उजाळा दिला. गिरीश प्रभुणे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “सुधीर गाडगीळ हे सांस्कृतिक महाराष्ट्राचा चालताबोलता इतिहास आहे!” असे गौरवोद्गार काढले.
सत्कारानंतर श्रीकांत चौगुले यांनी मार्मिक प्रश्नांच्या माध्यमातून सुधीर गाडगीळ यांच्याशी मुक्तसंवाद साधला. त्यातून पु. ल. देशपांडे यांच्या गप्पा मारण्याच्या शैलीतून जनसमुदायाशी संवाद साधण्याच्या कलेने आपण निवेदन क्षेत्राकडे वळलो. १९७२ मध्ये ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या निवेदनाला अमाप लोकप्रियता लाभली. त्यामुळे पत्रकारितेची नोकरी सोडून पूर्ण वेळ व्यावसायिक निवेदक म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला; आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील असूनही माझ्या निर्णयाला घरातून पाठिंबा मिळाला. पन्नास वर्षांहून अधिक काळ निवेदक म्हणून काम करताना सुमारे साडेसहा हजार मुलाखती घेतल्या. त्यामध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती, नाट्य – चित्रपट कलावंत, राजकारणी, समाजकारणी, साहित्यिक, संपादक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा समावेश आहे. दूरदर्शनवरील ‘आमची पंचविशी’ यासारखे कार्यक्रम खूप लोकप्रिय झालेत. रोजनिशी लिहिण्याची सवय असल्याने त्यांतून सोळा पुस्तकांचे लेखन झाले, अशी माहिती खुसखुशीत शैलीतून कथन करीत गाडगीळ यांनी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, मंगेशकर कुटुंबीय, पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, दादा कोंडके, गोविंद तळवलकर अशा दिग्गजांच्या आठवणींचे खास किस्से सांगितले. ‘पुण्यात सांस्कृतिक स्थित्यंतर झाले असले तरी गुणवत्तेचा अभाव जाणवतो!’ अशी खंत व्यक्त करून, ‘पालकांनी मुलांच्या सुप्तगुणांना वाव द्यावा!’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचे अभिवाचन केले. शिरीष पडवळ यांनी प्रास्ताविक केले. गाडगीळ यांच्या हस्ते शहरातील निवेदकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. कलारंजनचे कार्यवाह आर. बी. पाटील यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
______________________________
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*वारस होऊ सैनिकी परंपरेचे…*
https://sanwadmedia.com/156399/
काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या
युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी
निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन
असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली 21 वर्षे अविरतपणे करित आहे.
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
👉शैक्षणिक वर्ष 2025 – 26 करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ६ वी च्या वर्गासाठी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
https://forms.gle/vPE7oVGpsLmEUMw68
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*जाहिरात लिंक*👇
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*