मसुरे :
प्रति वर्षाप्रमाणे श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर मसुरे मर्डेवाडी येथे वार्षिक जत्रा उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजता श्री निलेश गोरे प्रस्तुत महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. यावेळी रात्री दहा वाजता दत्तप्रसादीक भजन मंडळ गडघेरा यांचे सुश्राव्य भजन, रात्री ११.३० वाजता श्री देव विठ्ठल रखुमाई देवतेची मंदिर सभोवती पालखी मिरवणूक आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोद्धार ट्रस्ट सर्व सदस्य आणि मर्डे वाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.