सामाजिक कार्यकर्ते व्यापारी उमेश साळगावकर यांचे निधन
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौक येथील घड्याळ
व्यावसायिक उमेश साळगावकर यांचे आज अल्पशा आजारानं दुःखद निधन झाल. त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
कै. उमेश साळगावकर यांचा घड्याळ विक्री व दुरूस्तीचा व्यवसाय होता. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजकारणात देखील ते सक्रिय होते. सर्वक्षेत्रात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.