You are currently viewing संकोचाच्या बेड्या….!!

संकोचाच्या बेड्या….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*संकोचाच्या बेड्या….!!*

 

शरीर कसही असो

आत आपण असतो

संकोच हा कसला

दुस-यांना कसे दिसतो…

 

हास्याच्या बदल्यात हास्य

ना विकत घ्यावं लागतं

ना फुकट द्यावं लागत

हास्यतर ओठावरचं असतं..

 

थुलथुलीत सुटलेलं पोट

कधीतरी द्वंदात सापडतं

स्वतःवर कां रूसता..

रॅम्पवाॅक करायचं नसतं..

 

सुडौल शरीराच्या बेड्या

मनातून काढून टाका

स्वतःवर प्रेम करा

संकोच बाळगू नका..

 

जशी आयुष्याची बेरीज

तेवढाच शरीराचा गुणाकार

रंग उंची केस…संकोचाच्या बेड्यात

अडकतो देहाचा आकार..

 

वयाच्या प्रत्येक वळणावर

मुठीत तुमचे वर्तमान

कुणी काहीही म्हणो

बाळगा स्वतःचा अभिमान ..

 

शरीर कसही असो

आत आपण असतो…

कुणी काहीका म्हणेना

आयुष्य डौलदार जगतो..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा