*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“आदरणीय साने गुरुजी जयंती निमित्त अभिवादन!”*
साने गुरुजी समाजसेवक प्रतिभावंत
सृजनशील कवी लेखक क्रांतिकारी भक्तIIधृII
जन्मले रत्नागिरी पालगड खेडगावांत
घराणे होते त्यांचे वैभव संपन्न श्रीमंत
परिस्थितीने दिला फटका गांव गेले सोडूनII1II
पिता छत्र हरपले गुरुजींचे बालवयांत
आईने केले त्यांचेवर संस्कार बालपणांत
मातृ शिकवणुकीनं झाले उच्चशिक्षितII2II
काही काळ शिक्षकी नोकरी केली अंमळनेरांत
घुसले सविनय कायदेभंगाच्या चळवळीत
काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढले देश प्रेमार्थII3II
अनिष्ट रुढीं विरुद्ध लढले भेदातीत
समाज सुधारक झाले बहुभाषा शिक्षित
अंर्तभारती चळवळीने केली भारत जोडII4II
साधना साप्ताहिक काढले देशभक्ती प्रेरित
बहुतांश लेखन भाषांतर केले तुरुंगात
हिंदू धर्मावर लिहिला भारतीय संस्कृती ग्रंथII5II
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावेत
कविता असंख्य श्यामची आई कादंबरी प्रसिद्ध
मातृभक्ताने स्वीकारले देशसेवा ब्रह्मचर्य व्रतII6II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.