You are currently viewing प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभार्थ्यांनी प्रस्ताव कागदपत्रांसह सादर करावेत

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभार्थ्यांनी प्रस्ताव कागदपत्रांसह सादर करावेत

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभार्थ्यांनी प्रस्ताव कागदपत्रांसह सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सन 2019 मध्ये सुरु करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांना 2 हजार रुपये दर तीन महिन्यांनी म्हणजेच वर्षाला 6 हजार रुपये निधी मिळत आहे. 18 व्या हप्त्याचा जिल्ह्यात 1 लाख 20 हजार 285 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 46 हजार 537 लाभार्थी हे विविध कारणांमुळे अपात्र करण्यात आलेले आहेत. यामध्ये देवगड 4 हजार 730, दोडामार्ग 3 हजार 678, कणकवली 5 हजार 215, कुडाळ 8 हजार 942 मालवण, 5 हजार 5, सावंतवाडी 13 हजार 173, वैभववाडी 3 हजार 754 व वेंगुर्ला 2 हजार 43 एवढे अपात्र लाभार्थी आहेत. अपात्र लाभार्थीच्या याद्या कृषी सहाय्यकांमार्फत ग्रामपंचायत कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या याद्यामधील पात्र लाभार्थींनी आपले प्रस्ताव 7/12, 8अ, फेरफार, आधारकार्ड (पती/पत्नी/18 वर्षाच्या आतील मुले) या कागदपत्रांसह कृषी सहाय्यकांमार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. जेणेकरुन पात्र लाभार्थी यांची पडताळणी करुन त्यांचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात येतील. त्यांचा लाभ पुर्ववत सुरु करता येईल, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा