*श्रमसंस्कार शिबिरातून जबाबदार व संवेदनशील नागरिक घडतात- शरदचंद्र रावराणे*
वैभववाडी
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे
दि.१६ डिसेंबर ते २२ डिसेंबर ३०२४ या कालावधीत ‘विकसित भारत बनवण्यामध्ये युवकांचे योगदान’ या प्रमुख संकल्पनेवर आधारीत या शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारण, सायबर सुरक्षा, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, मतदार जनजागृती, रक्तक्षय तपासणी व जनजागृती, रस्ते सुरक्षा, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. सदर शिबिर कालावधीत गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वनराई बंधारे बांधणे, मतदार जनजागृती, पर्यावरण संवर्धन, नशाबंदी, रक्तक्षय तपासणी, व्यक्तिमत्त्व विकास, विविध सामाजिक विषयावर जनजागृती फेरी व पथनाट्य सादरीकरण इत्यादी उपक्रमांमध्ये सर्व स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेलता.
या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये श्रमसंस्कार शिबिर हे जबाबदार व संवेदनशील नागरिक घडवण्याचे एक अत्यंत चांगले माध्यम आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे उपस्थित होते. अशा शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा स्वयंसेवकांनी आपले भावी करिअर घडवण्यासाठी उपयोग करावा असे सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. व्हि. गवळी यांनी महाविद्यालयामार्फत आयोजित कऱण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या सुप्त गुणांचा विकास करावा असे आवाहन केले.
सदर शिबिर कालावधीमध्ये स्वयंसेवकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये साहिल नर -FYBSc (उत्कृष्ट स्वयंसेवक), तन्वी पवार-TYBA (उत्कृष्ट स्वयंसेविका), वैष्णवी गायकवाड-SYBSc (उत्कृष्ट गट प्रमुख) इत्यादींना गौरविण्यात आले या समारोप प्रसंगी व्यासपीठावर सांगुळवाडी गावच्या सरपंच श्रीमती. पूजा रावराणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यवान सुतार, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. व्हि. गवळी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम. ए .चौगुले उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. ए. भोसले, प्रस्तावना प्रा. डॉ. एम. ए. चौगुले व आभार डॉ. एस. सी. राडे यांनी केले.