कुडाळ
नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी,आशा सेविकांना सुध्दा कोरोनाची लस द्या,अशी मागणी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यात असे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात जिल्ह्यात काम करणाऱ्या सर्वच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत क्षेत्रात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे.आपल्या जीवावर बेतूनही त्यांनी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केला आहे.त्यामुळे आता लस देताना त्यांचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर धोरण ठरविण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.