केसरीत तरूणाची आत्महत्या
सिंधुदुर्ग
सावंतवाडी तालुक्यातील केसरी- धनगरवाडी येथील धुळू मळू डोईफोडे (वय ४५) या तरुणाने घरा गळफास लावून आत्महत्या केली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे .धुळू हा सावंतवाडी येथील हॉटेल सागर पंजाब येथे कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अजुन स्पष्ट झाले नाही.