You are currently viewing जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आजपासून प्रारंभ

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आजपासून प्रारंभ

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आजपासून प्रारंभ

सावंतवाडी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

सावंतवाडी

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा शालेय गटा साठी ,आज पासून जिमखाना बॅडमिंटन हॉल सावंतवाडी येथे सुरू झाल्या.याचे उद्घाटन सावंतवाडी नगरपालिकेचे चे मुख्याधिकारी मां.श्री सागर साळुंके साहेब यांच्या हस्ते झाले.

यावेळी रोटरी चे अध्यक्ष मां श्री प्रमोद भागवत रो. सुबोध शेलाटकर,श्री नंदकुमार प्रभुदेसाई.श्री शेख.श्री केतन आजगावकर.कु.मयुरी भगत,हे उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये 90 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.या स्पर्धा स्नेह नागरी सहकारी पतसंस्था सावंतवाडी.रोटरी क्लब सावंतवाडी, व् मोर्निग बॅडमिंटन क्लब सावंतवाडी यांच्या तर्फे भरवण्यात आले आहे.श्री सागर साळुंके साहेब यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात,खेळाडूंना प्रोत्साहन देणे साठी सर्व सहकार्य देण्याचे मान्य केले. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.केतन आजगावकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा