सावंतवाडी :
सावंतवाडी शहरासह चराठा ग्रामदैवत असलेल्या श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार २७ डिसेंबर रोजी होत आहे. देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी होते. रात्री उशिरा आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. जत्रोस्तवाला उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.