*डॉ.शिवचरण उजैनकर फाउंडेशनचे (मुक्ताई नगर) सन्मा.सदस्य कवी, शाहीर मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हिरव्या रानात.*
कशी उभी तू
हळदीच्या रानात
सांडला गंध
हिरव्या भांगात गं
सळसळते पाने
नाजूक उन्हात
उसळते उर्मी तुझी
तनामनात गं
सडपातळ काया
तुझी नवकांती
उसळती डोलती
कबुतरे वाऱ्यावर गं
झाकोळले आकाश
लपला पहान्या
सुर्य ढगाआड चोर
कपटी मनात गं
चित्तचोर विभोर
चंचल उडे पदर
अवखळ खट्याळ
करीतसे चाळा गं
कवी -✍️
मनोहर पवार .