You are currently viewing अजून आहोत कां एवढे रानटी?

अजून आहोत कां एवढे रानटी?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अजून आहोत कां एवढे रानटी?*

 

आता कुठे ते बिगुल वाजले

हा तर “फक्त आभास आहे”

शस्त्रास्त्रांना *धार* लावणे

अजून आमचे *बाकी आहे*

 

जाहीर झाल्या युध्द तारखा

घोड्यांना खरारा झाला सुरू

तलवारीची *साफ सफाई*

कुणी म्हणतसे नका करू

 

असून उत्सव संविधानाचा

नाही कुठला *राडाबिडा*

नका *परजू* भाले फरशा

करणार नाही कुणी राडा

 

असून उत्सव पंचवार्षिक

कुठे रहातो ताबा जिभेवर

लगाम सुटता सैल घोड्याचा

उभा रहातो मागचे पायावर

 

वापर करून काळ्या धनाचा

जिंकतो कां हो कधी कुणी

वाहून नेती *बंडले नोटांची*

बातमीला असे खमंग फोडणी

 

उलटून गेली वर्षं पंचाहत्तर

कधी येणार हो *मॅच्युरिटी*

लांड्या लबाड्या करून जिंकती

अजून आहोत कां एवढे रानटी

 

विनायक जोशी ✍️ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा