You are currently viewing कृषी दिन

कृषी दिन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कृषी दिन* 🌹

 

शेतकरी बाप माझा

काळ्या वावरी कष्टतो

कामाने राबराबतो

चिंब घामाने भिजतो

 

पाटाच्या पाण्यात गातो

त्याच्यासंगे पांडुरंग

रान पाखरेही गाती

बा च्या संगती अभंग

 

माझी माय रखुमाई

तिचा पदर फाटका

जन्म कष्टभर करी

करी संसार नेटका

 

शेतमळा फुलवितो

पिका भाव नाही येतो

साऱ्या जगाचा पोशिंदा

कसा मनात रडतो

 

रोजचेचं करी कष्ट

नाही उसंत तयाला

कर्ज फिटण्याचं मग

ध्यास एकच लागला

 

काळ्या आईला जपतो

टिळा मातीचा लावतो

रात्रंदिन सेवा करी

स्वप्न मनात पाहतो

 

आषाढी कार्तिकी वारी

बा ची कधी ना चुकली

त्याच्या कष्टाला राहु दे

नित्य विठुच्या सावली

 

येता मतदान वारं

मिळतात आश्वासनं

येता जाता मांडवात

ऐके कोरडे भाषण

 

बळीराजा अन्नदाता

दिन दुबळ्याचा लेक

सरकारा देरे त्यास

तुचं वागणुक नेक

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा