*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आठवण तुझी*
तू सोडून गेलास मला
माझा काय दोष होता
आता एकटीच जगु कशी
नशीबाचा रोष होता ….!!
आज आठवण तुझी
पिच्छा माझा सोडत नाही
विसरु तरी कशी मी
काळीज माझं कठोर नाही ….!!
आज तुझ्या माझ्या भेटीचा
तो अनमोल दिवस होता
भविष्याची स्वप्न रंगवताना
वेगळाच आनंद होता …..!!
जेवढे क्षण माझे
तुझ्या सहवासात गेले
उरले आता काही क्षण
तुझ्या शिवाय जगणे झाले …..!!
आज जेव्हा पुन्हा मी
मागे डोकावून पाहते
तू आवाज देशील कुठुन तरी
या खुळ्या आशेवर जगते ….!!
माहित आहे मज सारे
गेलेले पुन्हा येत नाहीत
सात जन्माच्या भाकड कथेवर
माझा तरी विश्वास नाही …..!!
सुख दुःखाचे सोबती
सारे या जन्मीच मिळतात
काही दिवसच सोबत राहतात
सारेच एकटे निघुन जातात …..!!
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*