ऑन कॉल रक्तदाते आत्माराम सातार्डेकर यांनी पुन्हा वाचवले एका रुग्णाचे प्राण
वेंगुर्ला
जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे सावित्री बापू परुळेकर वय. ६० (माणगाव) या पेशंटला अशक्तपणा असल्याने अत्यंत दूर्मिळ अशा एबी निगेटीव्ह रक्ताची तातडीची गरज होती आणि पेशंटचीही स्थिती गंभीर होती. अशा वेळी ताबडतोब धावून येणारे नियमित ऑन काॅल रक्तदाते आत्माराम शंकर सातार्डेकर (वेंगुर्ला.उभादांडा) यांनी पुन्हा एकदा त्वरीत जिल्हा रुग्णालय रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केले. त्यांचे हे आत्तापर्यंतचे सहावे रक्तदान असून समूहावर पोस्ट पाठवलेली समजल्यावर केवळ दोन मिनिटात त्यांनी आमच्याशी संपर्क साधून ते त्वरीत रक्तदानासाठी जाण्यास तयार झाले. आत्माराम सातार्डेकर हे ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे कार्यकारिणी सदस्य बाळकृष्ण उर्फ नाना राऊळ यांचे मित्र असून नानांच्याच संपर्कात राहून नियमितपणे रक्तदान करत असतात. जवळपास सव्वातीन महिन्यापूर्वीच त्यांनी रक्तदान करुन एका गरोदर भगिनीच्या बाळंतपणात तिचा बहुमोल जीव वाचविला होता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *दोडामार्ग मोबाईल रीपेरिंग व विक्री मधील एकमेव नाव*
📲 *गॅलॅक्सी मोबाईल, दोडामार्ग* 📲
*संपर्क : 9359364596*
➖➖➖➖➖➖➖➖रक्ताची गरज तातडीने पूर्ण करणार्या आत्मारामजींसहीत ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी आभार मानले.
👉👉 *पहा अधिक बातमी :*
https://kutumbapp.page.link/9rRWztFyH75nZ2wa9
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
Call On :
9765446118