*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रोज काय लिहायचं?*
प्रश्नच नसतो
रोज काय लिहायचं
गाठोडं अनुभवांचं
भरलेलं….
घटना प्रसंग
विविध घडत असतात
कल्पना सुचतात
कितीतरी…..
सुखाचे क्षण
आयुष्यातील लिहिते स्मरून
दु:ख खोडून
टाकते….
मळा शब्दांचा
सतत बहरला असतो
प्रश्न नुरतो
लिहिण्यास
साधेसे शब्द
भावुकतेची त्याला किनार
ओळी अलवार
सुचतात….
मन आनंदी
रोज लिहिते काही
शब्दांची ग्वाही
लिहिण्यास…..!!
०००००००००००००००
अरुणा दुद्दलवार @✍️