You are currently viewing “क्षेत्र गोंदवले”

“क्षेत्र गोंदवले”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”क्षेत्र गोंदवले”*

 

गोंदवल्यात मिळे अवघा आनंदी आनंद

महाराज पहाती भक्तांची आसुशीने वाट।।धृ।।

 

नित्यक्रम चाले अन्नदान गोंदवल्यांत

समाधी पाहता वाटे प्रसन्न समाधान

इच्छापूर्ती करती महाराज मिळे प्रसाद।।1।।

 

सर्व सेवक पंच सेवा करिती निष्काम

काकड आरती सांभाळीते पर्यावरण

थकवा जाई पळून ऊर्जा देई नवनीत।।2।।

 

गोंदावले क्षेत्र आहे ज्ञान विद्यापीठ

प्रत्येकास मिळे आवडीचे सेवा क्षेत्र

नाम काम चाले चैतन्य जाणवत।।3।।

 

गोंदवल्यात शिकावे उत्तम व्यवस्थापन

संयोजन राहे कार्याचे स्वच्छ शिस्तपूर्ण

ना कशास कमी श्रींचा वास कणकणांत।।4।।

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा