*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*४८) माझे गाव कापडणे..*
मंडळी, भाऊंनी अगदी तपशीलवार असा
ॲांखो देखा, स्वत: तावूनसुलाखून निघालेला
असा अनुभव आपल्यासमोर जीवंत केला आहे.
आता पुन्हा एकदा वाचतांनाही माझ्या हृदयात
धडधड वाढून ठोके वाढत आहेत. विचार करा
प्रत्यक्ष आगीशी खेळत या मंडळींनी केवढी जोखिम पत्करली होती याचा आपण विचारही
करू शकत नाही, ते तर ते आयुष्य रानावनात
भटकत रोजच जगत होते. ही अशी कोणती प्रेरणा होती की जीवावर उदार होऊन हे सारे
वीर आगीशी खेळत होते? तर.. तो होता अपला देश, आपली मायभू, जिची मुक्तता करण्यासाठी ही तरूण मुले जवानी पणाला
लावून रानोमाळ अंधार कापत हिंडत होते.
यालाच म्हणतात, राष्ट्रप्रेम.. राष्ट्रनिष्ठा.. व
त्यासाठी जीवावर उदार होऊन लढणे.आजही
वेगळ्या अर्थाने राष्ट्र उभारणी साठी पुन्हा एकदा अशाच राष्ट्रनिष्ठेची आपल्याला गरज
आहे असे मला वाटते.राष्ट्र स्वतंत्र झाले म्हणजे
संपले कर्तव्य ही भावनाच चुकीची आहे. त्या
नंतर खूपकाही करायचे असते पण आपण सारेच आता इतीकर्तव्यता झाली असे समजून
मशगुल होतो हे चुकीचेच आहे. प्रत्येक क्षणी
माझ्या देशासाठी मी काय केले पाहिजे हाच
विचार आपण करायला हवा पण प्रत्येक क्षणी
आपण देशाकडून फक्त काय मागणी करता
येईल याचाच विचार करतो. राष्ट्राला काही
दिले पाहिजे हा विचारच आम्ही करत नाही.
काय मिळेल? फुकटात कसे मिळेल या कडेच
आपले लक्ष असते ही काही राष्ट्रप्रेमाची खूण
आहे असे मला वाटत नाही.हा अत्यंत स्वार्थी
विचार मनातून काढून टाकत आपण राष्ट्र
उभारणीचाच विचार रात्रंदिवस केला पाहिजे.
तेच आपले प्रथम कर्तव्य आहे हे लक्षात ठेवा.
आज कितीतरी भीषण प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर “आ” वासून उभे आहेत.
पण आपले वर्तनच असे आहे की जणू त्या
प्रश्नांशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. स्वार्थाची पोळी कशी भाजून घेता येईल एवढेच जणू आमच्या जगण्याचे उद्दिष्ट
शिल्लक राहिले आहे.लोकसंख्या हा आमचा
मोठा प्रचंड शत्रू आहे. त्यामुळेच कितीही प्रगती
केली तरी प्रश्न संपतच नाहीत. म्हणून अग्रक्रमाने या साठी सामुहिक प्रयत्न व जनजागृती झाली पाहिजे पण सारेच उदासीन.
इथे राष्ट्राची पडली आहे कुणाला? जो तो तुंबड्या भरण्यात गर्क आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र स्वयंभू बनवण्या
साठी देशातील प्रत्येकाचाच हात त्या कार्यात
गुंतला पाहिजे त्या शिवाय राष्ट्र पुढे जाईलच
कसे? तर आज आपण हा विचार मनात रूजवू
या व भारत अधिक सक्षम बनवू या.
चला… खजिना आपली वाट पाहतोय..
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंॅ
तर मंडळी…लक्ष द्या…
खजिना लुटण्याची तयारी होत असतांना डॅा.
उत्तमराव पाटील बोरकुंड येथे मला भेटण्यास
आले.ते ही होणाऱ्या या कार्यक्रमासाठी थांबले. डॅा.उत्तमराव यांचे पत्र घेऊन मी दोन घोडे गाडीचे तांगे घेण्यासाठी तळोदे गावी गेलो होतो.त्याचे आधी मी स्वत:, डॅा.उत्तमराव व जी.डी.लाड , जगन्नाथ गायकवाड,अशा चौघांनी पोलिस स्टेशन चिमठाणा याची पहाणी केली होती. साळवे गावासमोर चढ होता.त्या चढणीवर मोटार खजिना जाणारी मोटार थांबवून लुटण्याचा कार्यक्रम ठरला होता.पुढे कोठे जावयाचे हे सर्व ठरवले गेले.लामकानी मार्गे देऊर व तेथून मालेगाव तालुका हद्दीतून बोरकुंड गावीच यावयाचे ठरले होते.सुरूवातीला साक्री शिरपूर तळोदे
मामलेदार खजिना लुटावा असा कार्यक्रम होता.
त्या प्रमाणे प्रत्येक तालुका कचेरीची पहाणी
झाली होती.परंतु पोलिस मित्राचे सल्यावरून
मामलेदार कचेरी लूट न करता धुळे येथून
नंदुरबारकडे जाणारा सरकारी खजिना लुटावा
असे नक्की ठरले. त्यासाठी साधनांची जुळवाजुळव आम्ही करत होतो.मी तळोदे गावी असतांनाच पोलिस मित्र रात्री बोरकुंडला आले. व म्हणाले,साडेपाचलाख रूपये नंदुरबार येथे ता.१४/४/४४ रोजी जात आहेत.साधनांची काही तयारी नाही. सातारकर १२ मंडळी होती.चौघे परत गेले होते. ( कारण त्यांना अहिराणी समजत नव्हते ) व्यंकटराव,शंकरराव,उत्तमराव व मी असे एकूण या गटात आम्ही सोळा जण होतो.परंतु मी तळोदा गावी अडकलो होतो.ही
१५ मंडळी रात्री १२ पर्यंत १३-४-४४ मोहाडी गावी पायी निघाले.(आता तरी आपण जाऊ का मंडळी?)रामचंद्र बाबाजी यांना भेटून त्यांचेकडून एक मोठी बैलगाडी दुसरा घोड्याचा टांगा मिळविला.रामचंद्र बाबाजी घोडागाडीत स्वार झाले.बैलगाडीवर त्यांचा सालदार होता.दोन्ही गाड्या पांझरा नदीच्या पुलावर आल्या.आणि दोन पोलिसांनी गाड्या अडविल्या.एवढ्या रात्री बिना लाईटने कुठे चाललात ..?
डॅा. उत्तमराव म्हणाले, लग्नाला जात आहोत.
पोलिस झडती मागू लागले.विनवणी करून
पाहिली. पोलिस ऐकेनात.हे पाहून सातारकरांनी पोलिसांना धरले.त्यांचे कपडे काढून घेतले. शिट्ट्या ठेचून निकामी केल्या.मग पोलिस शरण आले. कारण सातारकर म्हणाले, नदीत वरून फेकून देतो…(ये हुई ना बात … सातारकर … जिंदाबाद…)तुम्हाला ठारच मारतो…दहा रूपये
देऊन त्यांचे कपडे, टोप्या, शर्ट परत केले.
पोलिस गे …ले …(आपलेच पण.. गुलामी करत होते).
परंतु ह्या गडबडीत मोठी गाडी परत मोहाडीकडे
गेली.त्यात व्यंकटराव धोबी सात जण फक्त
डांगुर्णे गावी सकाळी १४-४-४४ रोजी ११ वाजे
पावेतो पोहोचले.इकडे रामचंद्र बाबांनी चौघेजण टांगा घेऊन चिमठाणे गावी पोहोचवले… ते स्वत: दराणे गावी त्यांचे सासुरवाडीला निघून गेले .डॅा. उत्तमरावांसह चौघांनी भारत खादी भांडार धुळे येथे माझे मित्र रामभाऊ सोपेंशी मी ओळख करून दिली होती. त्यांची भेट घेऊन त्यांनी गायकवाड धुळेकर यांची मोटारगाडी भाड्याने करून दिली व पैसे ही दिले. एकूण आठ जण चिमठाणे गावी मोटारस्ट्यांडवर येऊन पोहोचले…..
भाऊ पुढे म्हणतात …..(हो.. आपण विष्णुभाऊंचे हस्तलिखित वाचत आहोत ….)
गुराख्याने पोलिसांना खबरदिली.मालमोटारीचे
एक चाक काढून ट्रक ड्रायव्हरने जखमींना शिंदखेडे दवाखान्यात नंतर धुळे येथे सरकारी
दवाखान्यात नेले.शिंदखेडे व चिमठाणे येथून
पोलिस फोर्स पाठलाग करण्याकरता निघाला.
रूदाणे गावच्या जंगलात( मंडळी, तेव्हा अफाट जंगल होते. जंगलतोड झालेली नव्हती)पोलिस व क्रांतिकारक यांच्यामध्ये सायंकाळी युद्ध झाले.श्री.लाड यांच्या पायाच्या पोटरीतून गोळी आरपार गेली म्हणून जखमी झाले.नागनाथ यांच्या छातीला गोळी चाटून गेली होती व रावसोा.कळके यांच्या मनगटात एक गोळी फसली.लवकरच अंधार पडला नि युद्ध संपले.
पोलिस लामकानी गावी पळून गेले.चौघा चौघांच्या दोन टोळ्या करून सैदाळे गावच्या मार्गाने मेहेरगांव धुळे याकडे शंकर माळी यासह चौघे निघाले.सैताळे गावी १०रूपये देऊन भाकरी व दही मिळवले.(किती हालअपेष्टा देशासाठी) बादली दोर मागून घेऊन विहिरीवर जेवण करीत असतांना म्हातारीच्या सांगण्यावरून लोक जमा
झाले.व चावडीवर चला,तुम्हाला आम्ही चांगले
जेवण देतो म्हणाले.
चावडीवर गेल्यावर यांना वाटले आपल्याला ही
मंडळी बैलगाडी करून पोहोचवतील पण उलट
झाले.चावडीत त्यांना कोंडू लागले हे लक्षात आले तेव्हा गोळीबार केला.सर्व पळून गेले.
पुढील प्रवास सुरू झाला.नवलाणे गावचे
नांगरटी शेतात नोटा पुरून प्रत्येकी पाच हजारांच्या नोटा बरोबर घेऊन वडजई गावी
सकाळी पोहोचलो.
उपाशीतापाशी, जंगलातून जोखमीचा पायी
प्रवास करू का आपण आज?
बरंय् मंडळी.. राम राम ..
जयहिंद.. जय महाराष्ट्र..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)