You are currently viewing ॥शेकोटी संमेलन॥

॥शेकोटी संमेलन॥

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *॥शेकोटी संमेलन॥*

 

शेकोटी संमेलनले जाऊत…

चला शेकोटी संमेलन जाऊत…

 

दर वरीसले भरस उरूस

राजीखुशीम्हां जावानी हौस

संमेलन से खूपच खास

तठे अहिरानी गाना गाऊत…

चला शेकोटी संमेलन जाऊत…

 

सुरेश पवारना आवाका मोठा

संमेलनम्हां देखा झपाटा

इठोबा फिरस जथातथा

रातले जागरण तमासा देखूत

चला शेकोटी संमेलन जाऊत…

 

भारतभरना इथीन लोके

आदिवासीसनी संस्कृती तठे

डफ डमरू भेरी वाजूत

पायम्हा चाय बांधी नाचूत

चला शेकोटी संमेलन जाऊत…,

 

मजा मजा हो भलतीच मजा

आम्हीच प्रजा नि आम्हीच राजा

कवीसंमेलन,भलताच हौसी

संमेलन गंगा संमेलन काशी

तठे साहित्य जत्राम्हा नाचूत

चला शेकोटी संमेलन पाहूत ….

 

दहा तारीख अकरा तारीख

लक्ष ठेवज्या बरकां बारीक

दोन दिवस झोपानं नही

धूम मचाडूत बठ्ठासना सहित

नाचगानास्नी मजाबी लेउत

चला शेकोटी संमेलन पाहूत ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा