पुणे :
काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे व साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व बहारदार कविसंमेलन कार्यक्रम शनिवार दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी पुणे येथे संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ भावकवी व संतसाहित्यिक व चित्रकार श्री. वि. ग. सातपुते होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार लेखक व्याख्याते श्री. पितांबर लोहार हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कवी व गायक श्री. सुभाष चव्हाण आणि ज्येष्ठ कविवर्य व चित्रकार श्री. शिवाजी सांगळे, बदलापूर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल यांनी केले. इंदौर येथील कवयित्री स्मिता सराफ यांनी गणेश वंदना गायन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले.
*म्हणींचं म्हणणं – प्रातिनिधिक काव्यसंग्रह*
*सापडलेली पत्रे – मराठी पत्र संग्रह*
*पहावे आपुल्या देशा – लेखिका वंदना ताम्हाणे*
*मनमंथन – कवयित्री सविता कुंजीर*
*हिसाब जज़्बातों का – कवयित्री संगीता काळभोर*
*सफर बालनगरीची – कवयित्री संगीता काळभोर*
या कार्यक्रमात वरील पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी मान्यवरांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कविसंमेलन संपन्न झाले त्यात खालील कवी आणि कवयित्री यांनी भाग घेतला..
१) मिनल खंडारे, दर्यापूर
२) संतोष वाघाडे, अंजनखेड, नांदेड
३) तेजस धेंडे, करमाळा
४) संगीता काळभोर, मुंबई
५) ज्योति सिंगारे, बुलढाणा
६) हिमानी बागोरे, पुणे
७) अर्चना धोंडगे, नाशिक
८) निलेश घोडे, मुंबई
९) कविता ढोबळे, सदाशिवनगर
१०) गौरी काळे, पुणे
११) स्मिता सराफ, इंदोर
१२) क्रांती शेलार, नाशिक
१३) सुभाष धाराशिवकर, पुणे
१४) वंदना ताम्हाणे, मुंबई
१५) माधुरी वरवटकर, वर्धा
१६) सुनिता गायकवाड, नागपूर
१७) हेमलता शिखरे, मुंबई
१८) शिवाजी सांगळे, बदलापूर
१९) सविता कुंजीर,पुणे
२०) पौर्णिमा ढवळे, करमाळा
२१) राणी दबडे, मुंबई
२२) सर्वेज्ञा शेलार, नाशिक
२३) भाग्या खंडेलवाल, पुणे
२४) परेश माळी, पनवेल
२५) रत्नदिप आंदे, नांदेड
२६) सीमा गांधी, पुणे
२७) विवेक पोटे, पुणे
२८) अनुराधा, मुंबई
२९) सुभाष चव्हाण, पुणे
३०) शोभाताई जोशी, पुणे
३१) वि. ग. सातपुते, पुणे
३२) सुनिल खंडेलवाल,पुणे
सर्व कवींचा सन्मानपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता कविता ढोबळे यांच्या पसायदान गायनाने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काव्यानंद प्रतिष्ठान पुणेचे सचिव विवेक पोटे, कोषाध्यक्ष अमोल शेळके, साईश प्रकाशनच्या संचालिका स्वाती खंडेलवाल, शंतनू सांगळे, वंश खंडेलवाल, श्री. जालिंदर ताम्हाणे यांचे विशेष सहकार्य लाभले.