कोल्हापूर :
केळवद येथिल लेखक कवी शाहीर मनोहर पवार यांना १३ व्या मराठी ग्रामिण साहित्य संमेलनात रुई ता. इचलकरंजी जि कोल्हापूर येथे साहित्य रत्न पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदीर इंगळी ता. हात कनंगले जि. कोल्हापूर यांच्या वतीने हनुमान मंदीर सभागृह रुई जि. कोल्हापूर येथे १३ वे ग्रामिण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये कवी मनोहर पवार केळवद जि बुलढाणा यांना उपस्थित राज्य पाठ्यपुस्तक बालभारती पुणे राज्यपाल नियुक्त सदस्य डॉ. देविदास तारु साहित्यिक कवी लेखक पुरस्कार प्राप्त यांचे हस्ते तसेच जेष्ठ साहित्यिक किसन कुराडे आयोजक कवी सरकार इंगळी रामनाथ डेंगळे पत्रकार तसेच महादेव कुशापा कवियत्री डॉ. मंजुराजे जाधव, अशोक मोहिते, कवी मधुकर हुजरे, विनायक पाटील, सोन कुसळे नागपूर मनिषा तराळे आदी मान्यवर कवी हजर होते. कवी मनोहर पवार यांना स्वाभिमानी साहित्य प्रेरणा, शाहीर अण्णाभाऊ साठे काव्य रत्न, तसेच शाहीरी कला गौरव, जीवन गौरव, उत्कृष्ठ समाजसेवक, जिल्हा भूषण कला गौरव, असे अनेक विविध प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. वाचन लेखन आणि साहित्य कला सेवा वारसा जपणारे मनोहर पवार हे ग्रामिण भागातून नेतृत्व करीत आहेत. चित्रपट अभिनय लेखन, आणि पर्यटन तसेच शेती बरोबरोर साहित्य सेवा सातत्याने ते करीत असून विविध संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष, सदस्य आहेत. त्यांच्या कार्याचे मित्रपरिवार कडून शुभेच्छा आणि अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.