You are currently viewing ना. नितेश राणे यांचा मराठा समाजाच्यावतीने २५ रोजी भव्य सत्कार

ना. नितेश राणे यांचा मराठा समाजाच्यावतीने २५ रोजी भव्य सत्कार

ना. नितेश राणे यांचा मराठा समाजाच्यावतीने २५ रोजी भव्य सत्कार

सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सिताराम गावडे यांचे आवाहन

सावंतवाडी

हिंद रक्षक व मराठा समाजाचे नेते आमदार नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांचा भाजप व मित्रपक्षाच्या वतीने २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान समोरील पटांगणावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे . यावेळी सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीनेही कॅबिनेट मंत्री ना. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

सिंधुदुर्ग मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेले व कणकवली मतदारसंघातून सलग तीन वेळा विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार नितेश राणे यांची हिंदू रक्षक अशी छाप आहे, त्यांच्या मतदारसंघातील कार्याची दखल घेऊन भाजप पक्षाने त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली या संधीचे मंत्री नितेश राणे निश्चितच सोणे करतील असा विश्वास सकल मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी व्यक्त केला आहे.
भाजप पक्षाने महायुतीच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांचा सावंतवाडीत २५ डिसेंबर रोजी नागरी सत्कार करण्याचे निश्चित केले आहे,याच वेळी सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे तरी या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा